Live Love Laugh...
27Sept 2019

मानसिक ताणाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

प्राण्यांच्या जीवावर बेतणाऱ्या अनपेक्षित धोक्यांपासून वाचविण्यासाठी उत्क्रांतीवादाच्या दृष्टीकोनातून मानसिक ताणाचा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचे काम करतो आणि तो योग्य प्रकारे रुपांतरीत होत आला आहे. सर्व प्राणी अॅड्रेनलीन व ग्लुकोर्टीकॉईडस् ही संप्रेरके (हार्मोन्स) रक्तात सोडून मानसिक ताणाला प्रतिसाद देतात. ही संप्रेरके ताबडतोब हृदयाचे ठोके आणि उर्जेची पातळी वाढवतात. त्याच वेळी शरीराची पचनसंस्था किंवा पुनरुत्पादन संस्थेसारख्या अनावश्यक क्रिया बंद करते. ही प्रतिक्रिया म्हणजे अत्यंतिक ताणाला निरोगी प्रतिसाद असतो.

आजच्या जगात आपल्याला पैशाची चिंता करणे, आपल्या साहेबाला खुश करणे किंवा नियमितपणे खूप तास काम करणे अशा अनेक जीवन-मरणाशी निगडीत नसलेल्या संकटांमुळे मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. असे प्रसंग रोजच्या जीवनात घडत असतात आणि आपले शरीर त्याला जीवावर बेतणाऱ्या ताणाप्रमाणेच प्रतिसाद देत असते. त्याचा व्यक्तीच्या तब्बेतीवर आणि स्वास्थ्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

Stress Response System

मज्जासंस्था विशेषज्ञ (न्युरोसायंटिस्ट) रॉबबर्ट सॅपोलस्की, यांच्या मते मनोसामाजिक उत्तेजनामुळे आपल्या आयुष्यात सतत ताण उद्भवत असतो. दीर्घकाळ आणि सतत जाणवणाऱ्या मानसिक ताणामुळे खालील यादीप्रमाणे निरनिराळ्या शारीरिक क्रिया कमकुवत होतात:

 • प्रौढांचा मधुमेह आणि उच्च रक्तदाबात वाढ होण्याची शक्यता वाढते व त्याचा परिणाम म्हणून हृदय-रोग होऊ शकतात.
 • जठर व आतड्याचे विकार उदभवल्यामुळे एखाद्याच्या रोगप्रतिकारक संस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
 • पुनरुत्पादन संस्थेच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. काही व्यक्तींना लिंग ताठ ठेवण्यास किंवा काहींना मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते.
 • मानसिक ताण आपल्या मेंदूतील स्मरण, शिकणे आणि निर्णय घेणाऱ्या केंद्रात बिघाड घडवू शकतो. याचा परिणाम म्हणून ही केंद्रे ताण-तणावाखाली योग्य प्रकारे काम करताना दिसत नाहीत.
 • मानसिक ताणामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौध्दिक विकासावर विपरीत परिणाम होतो.
 • मानसिक ताणाला प्रतिसाद देताना काही संप्रेरकांच्या उत्पादनात जेव्हा वाढ होते तेव्हा सेरोटोनीन (Serotonin) सारख्या इतर संप्रेरकांचे उत्पादन कमी होते. त्याचा परिणाम शेवटी मानसिक औदासिन्य किंवा इतर काही मानसिक आजारात होऊ शकते.

वर उल्लेख केलेले आरोग्याचे प्रश्न हे जुनाट आणि वरचेवर उद्भवणारा ताण जो त्या व्यक्तीकडून सुरुवातीच्या काळात संबोधिला गेला नसल्यामुळे होतो हे येथे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे. . मानसिक ताण आणि चिंता अनुभवणे नित्याचे आहे आणि म्हणून व्यक्तीने या भावनांमुळे खचून जाऊ नये. बहुतेक वेळा लोक गैरवर्तन, पैशाची उधळपट्टी, खाण्या-पिण्याचा अतिरेक अशा आरोग्याला हानिकारक गोष्टींच्या आहारी जाऊन मानसिक रोगांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही प्रयत्नपूर्वक मुकाबला करण्यासाठी आचरणात आणाव्यात अशा पर्यायी यंत्रणा खालील प्रमाणे:

 • शारीरिक श्रम आणि व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि श्वसन नियमित होते. त्यामुळे प्राणवायूची पातळी वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून मेंदूचे कार्य सुधारते, मज्जासंस्था शांत होते, फुपुसे मोकळी होतात आणि झोपेचा दर्जा सुधारतो.
 • निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविणे, रोजनिशी किंवा नियतकालिक लिहिणे, सुवासिकतेचे उपचार करणे किंवा योगाभ्यास करणे यासारख्या आरामदायी क्रियांची मदत होऊ शकते. या सर्व क्रिया वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात – उदाहरणार्थ, डायरी लिहिण्यामुळे तुमच्या भावनांचे प्रतिबिंब तुम्हाल दिसते व त्यांच्यावर क्रिया करता येते. मानसरोगतज्ञ रॉबर्ट इमोंस सांगतात की यामुळे तुमचे स्वास्थ्य व जीवनातील आनंद यात लक्षणीय वाढ होते.
 • उद्दिष्टे व त्यांचे प्राधान्य ठरविल्याने मानसिक ताण टाळण्यास मोठाच हातभार लागतो. तुमचे दैनंदिन वेळापत्रक, जबाबदाऱ्या आणि कामांची छाननी करा आणि जी कामे अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची नाहीत ती त्यातून काढून टाका.
 • जेव्हा तुम्हाला खूप दडपण आल्यासारखे वाटत असेल तेव्हा तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि त्यांची प्रशंसा करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा वरवर नकारात्मक वाटणाऱ्या आणि भीतीदायक गोष्टींच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
 • मित्रांच्या बरोबरीने राहणे, कुटुंबीयांसमवेत वेळ घालविणे, संगीत ऐकणे, रंगकाम किंवा स्वयंपाक करणे अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा.

आपण जेव्हढा ताण सहन करतो तो सर्व तत्काळ बदलू शकत नसलो तरी आपण त्यांच्या हानिकारक परिणामांवर विजय मिळविण्याचे निरोगी मार्ग शोधू शकतो. सतत मनाला जाणवणाऱ्या ताणाशी मुकाबला करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या कृतींपैकी काही तुमच्या दैनंदिन जीवनात आचरल्याने तुमचा फायदा होईल. तुमच्या दिनक्रमातील एक भाग म्हणून त्यांचा समावेश केल्याने तुमच्या भावनांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यास मदत होईल. मानसिक ताणाचे व्यवस्थापन करणे हे सुरुवातीला आव्हान वाटेल परंतु जसजसा तुम्ही त्यात अधिक वेळ घालवाल तसा तो तुम्हाला अधिकाधिक सोपा वाटू लागेल.

X