लिव लव लाफ...
10 Feb 2019

आधार गट तुमच्यासाठी काय करू शकतो?

मानव हा स्वाभाविकपणे समाजात रमणारा प्राणी असल्यामुळे समाजाशी जोडले जाणे व त्याचाच एक भाग होऊन राहणे ही त्याची उपजत आणि मुलभूत इच्छा असते. त्याचा परिणाम म्हणजे आपण जिथे आहोत तेथील आसपासच्या व्यक्तींच्या समवेत आपला समुदाय तयार करतो. यामध्ये विशेष करून कुटुंबातील व्यक्ती, मित्र आणि दैनंदिन व्यवहारात संबंध येणाऱ्या व्यक्तींचा समावेश असतो.

संशोधनातून असे सूचित झाले आहे की जी व्यक्ती किमान एका किंवा अधिक व्यक्तींशी निरोगी संबंध ठेवते ती आनंदात असते. ही आनंदी वृत्ती ताण-तणावातून व विपरीत परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देते. स्वभावातील ही लवचिकता व्यक्तीची सकारात्मक दृष्टीकोन असणे, भावना संतुलीत ठेवण्याची क्षमता असणे अशी वैशिष्ठ्ये म्हणून सांगता येतील.

एका अभ्यासातून असे आढळून आले आहे की व्यक्तीमध्ये आपल्या आनंदी वृत्तीकडे चटकन परतण्याची क्षमता जेवढी अधिक असेल तेवढे त्याला मानसिक विकाराची लक्षणे आणि जीवनात घडणाऱ्या इतर मोठ्या दुर्घटना या सर्वांवर मात करून यशस्वी होणे सोपे जाते. आपल्या ओळखीतील मित्रमंडळी व नातेवाईक मंडळी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक विपरीत घटनातून सावरण्यासाठी आपल्याला मदत करतात.

वस्तुत: या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मित्रांबरोबरच्या निरोगी, घनिष्ट, भावनिक संबंधातून निर्माण झालेल्या मैत्रीचा थेट संबंध तुमच्या आयुष्यात वाढ होण्याशी आहे. कौटुंबिक नातेसंबंधापेक्षा मैत्रीमुळे आयुर्मर्यादेत होणारी वाढ खूप मोठ्या प्रमाणात अधिक आहे असे संशोधकांना आढळून आले आहे

Support Group

मानसिक विकार असलेल्या व्यक्तींना इतरांवर - मग ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी - विश्वास ठेवणे कठीण जाते. याशिवाय मानसिक विकाराशी निगडीत एक कलंक लागला असल्यामुळे अशा विकाराच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींना इतर कोणाला मदतीची हाक देणे सुद्धा कठीण जाते.

आधार गट हा अडथळा ओलांडण्यासाठी आपले अनुभव, अचूक ज्ञान व मानसिक विकार लवकर बरा कसा होईल ही प्रत्येकाला वाटणारी चिंता या सर्वामुळे सभासदांना आवश्यक असलेली मोकळीक देण्याचा पर्याय होऊ शकतो. असे गट सभासदांसाठी असे एक अनौपचारिक व्यासपीठ, जिथे मानसिक विकार असलेल्या, व्यसनाधीन, जुनाट आजार असलेल्या व्यक्तींबरोबर कसे राहावे हे समजण्यासाठी, आणि काही मदतीचा हात पुढे करणाऱ्या काळजीवाहू स्वयंसेवकांसाठी खुले करून देतो. या गटांचा उपयोग निरनिराळ्या मानसिक आजारांबाबत विस्तृत माहिती प्रसारित करण्यासाठीसुद्धा होऊ शकतो. तसेच या गटामुळे स्वयंसेवी व्यक्तींना आजाराबाबत व्यापक आणि संपूर्ण शिक्षण मिळते.


आधार गटात सहभागी का व्हावे?
 • व्यक्ती-व्यक्तींनी एकत्र येण्याने सर्वांना आवश्यक असलेला मैत्री, सलोखा तसेच सामाजिक, भावनिक मदत होण्यास उत्तेजन मिळण्यासाठी, एक सामाजिक गट तयार करण्यासाठी.
 • आधार गटातील सभासदांच्या प्रेरक शक्तीमुळे रुग्णाला आजारात मदत मिळण्यासाठी आणि त्यातून बरे होण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी
 • आधार गटातील सभासद जे अनुभव सांगतात त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत विकास, शिक्षण व एकमेकातील भावनिक सलोखा वाढविण्यास मदत होते.
 • आधार गटात सामाजिक कार्य करणारे सभासद स्वयंप्रेरणेतून स्वसन्मान व आत्मविश्वास मिळवतात.
 • गटाच्या बैठका म्हणजे सामाजिक स्तरावरील आपापसातील सुख-संवाद असतो. त्यामुळे चार-चौघात बोलण्याचे कौशल्य वाढीस लागते आणि सभासदांना समाजात पूर्वपदावर येण्यास प्रोत्साहन मिळते.
 • आधार गटामुळे बिना-औषध, सोयीची व परवडणारी सेवा मिळते ज्यामुळे स्वमग्नतेच्या वर्णपटामधील (ऑटीझम स्प्रेकट्रम) विकार, मानसिक आजार, दुभंगलेले व्यक्तिमत्व(स्किझोफ्रेनिया) यासारखे प्रदीर्घ मुदतीच्या आजारपणाच्या अवस्थेवर मात करण्यास मदत मिळते.
 • आधार गटातील सहभाग हा प्रत्येकाच्या स्वत:च्या सोयीनुसार व ऐच्छिक चा असल्याने तुम्ही तो कधीही सुरु किंवा बंद करू शकता.

स्व-आधार गटात असण्याचे तोटे काय आहेत?
 • आधार गटात गोपनीयता ठेवण्याचे मोठे आव्हान असू शकते कारण यातील सहभागी सभासदांवर कोणतेही बंधन घालता येत नाही.
 • सहभागी सभासदांना लोकांनी भरलेल्या हॉलमध्ये आपले अनुभव सांगण्याच्या इच्छाशक्तीची गरज असते.
 • काही सभासदांना सत्रामध्ये स्वत:ला मोकळेपणाने प्रगट होण्यास आणि स्व्हात:ची स्थिती असुरक्षित करून घेण्यास इतरलोकांच्या उपस्थितीमुळे खूप कठीण वाटते.
 • आधार गटात सत्र सुरु असताना सहभागी व्यक्तींचे वर्तन त्यात योगदान देण्यासाठी सामान्य पाहिजे. इतरांशी शेअर करण्यामुळे प्रेरित झालेले नको आहे.

संशोधानातून संशोधानातून असे दिसून आले आहे की आधार गटात सहभागी होणाऱ्यातील अधिकतर लोकांचा त्यातून फायदा घेण्याकडे कल असतो. तथापि एक सामान्य गैरसमज असा आहे की आधार गट हा औपचारिक वैद्यकीय उपचार पद्धतीला पर्याय आहे. पण हे खरे नसून आधार गट औपचारिक उपचार पद्धतीला पूरक आहे. असे म्हंटले जाते की प्रत्येक शरीर वेगळे आहे व त्याला उपचारातील घटकांचे प्रमाणसुद्धा वेगळे असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ला योग्य असेल त्याप्रमाणे या दोन्ही उपचारांचे प्रमाण ठरविणे महत्वाचे असते.

भारतातील काही प्रसिध्द आधार गटांमध्ये अल्कोहोलिक्स अॅनोनिमस, इंडिअन कॅन्सर सोसायटी, अॅक्शन

जर तुम्ही किंवा तुमच्या माहितीतील कोणी व्यक्ती मानसिक विकाराचा त्रास अनुभवत असल्यास आमची तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही मनोविकार तज्ञाशी संपर्क साधावा व त्यासाठी आमच्या संकेत स्थळावरील हेल्पलाईन साथीदारास अथवा तुमच्या जवळील मानसोपचार तज्ञ शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

X