Live Love Laugh...
Article. Published on Nov 14, 2019.

संवेदनशील व तत्पर मित्र होण्याचे ५ मार्ग

Friends

आपल्या जीवनात मैत्रीचा कल हा आधार देणाऱ्या अगदी निकटच्या स्रोतांपैकी एक ठरण्याकडे असतो. आपण मैत्रीसंबंध अतिशय संवेदनशीलतेने आणि विश्वासाने तयार करतो. हे नातेसंबंध आपल्या सामाजिक व भावनिक क्षमता सुधारु शकते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास व मानसिक स्वास्थ्य यामध्ये वाढ होऊ शकते.

पण हा प्रवास नेहमीच गुलाबाच्या ताटव्यासारखा आनंददायी नसतो. जेह्या तुमच्या मित्रांना बरे वाटत नसते किंवा मानसिक उदासीनतेने त्रस्त असतील तेव्हा काय होते? तुमच्या हस्तक्षेपाने त्यांचा त्रास अधिक वाढतो का? तुमच्या ज्या बोलण्याने मित्राला बरे वाटेल असे तुम्हाला वाटते परंतु त्यामुळे तुमच्या मित्राला वाईट वाटण्याची शक्यता असते अशा वाक्यांची एक यादी येथे देत आहोत.


जेव्हा तुम्ही म्हणता: “नीट ऐक. हे सगळे तुझ्या डोक्यातून निघालेले आहे!”

तुमचा मित्र असे ऐकतो: या बोलण्याने तुझ्यापासून आणि तुझ्या आकर्षक जगापासून मला दूर लोटले जात आहे. यामुळे मला अधिक एकाकी व वैफल्यग्रस्त वाटते आहे आणि मी माझ्या भावना किंवा विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. माझ्या मनात जे काही चाललेले आहे ते मी कसे बदलू शकतो? पण त्याआधी, कृपा करून तू मला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकशील का?

तज्ञांचे काय म्हणणे आहे: उदासीनता ही तुमच्या मित्राच्या डोक्यात किंवा मनात नसते. उदासीनता ही एक गुंतागुंतीची मानसिक स्वास्थ्याची वाटणारी चिंता असते आणि त्यामुळे सतत दु:खी वाटत असते, दैनंदिन जीवनातील आवडी नाहीशा होत असतात. एखाद्याचे दुखणे बोलून दाखविणे जसे अशोभनीय असते तसेच हे सुध्दा लक्षात घेणे महत्त्वाचे असते की शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजार सुध्दा भावना नसून वैद्यकीय उपचारांची गरज असलेली स्थिती असते.

जेव्हा तुम्ही म्हणता: “तू फक्त शांत आणि सकारात्मक रहा; तू आयुष्यात अतिशय नकारात्मक झाला आहेस!”

तुमचा मित्र असे ऐकतो: मला जेव्हा एकच वेळी राग, दु:ख, निराशा, एकाकी आणि त्याच वेळी निरीच्छही वाटते, तेव्हा मी शांत कसा राहू? तू मला जेव्हा नकारात्मक म्हणतोस आणि तेव्हा मला माझ्या कोशात-ज्यामध्ये सकारात्मक भावनेला अजिबात जागा उरलेली नाही- अधिक खोल टाकले जाते आहे. सध्याची माझी अवस्था क्षणार्धात शांत होण्यापासून खूप लांब गेलेली आहे.

तज्ञांचे काय म्हणणे आहे: मानसिक उदासीनता हा असा दुबळेपणा नाही की तुम्ही चुटकीसरशी सकारात्मकतेने तुमच्या मित्राला बाहेर काढू शकाल. अशा बोलण्याने तुमच्या मित्राचे विचार, भावना आणि वर्तन यावर आघात होऊ शकतो. उदासीनतेच्या आजाराच्या काही सामान्य लक्षणांमध्ये दु:खी वाटणे, डोळे भरून येणे, रिक्तपणा जाणवणे, असहाय्य वाटणे, निरुपयोगी झाल्यासारखे वाटणे, दोषी आणि/किंवा मनात वरचेवर आत्महत्येचे विचार येणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. म्हणून तुमच्या मित्रांना, विशेषत: ते अशा कठीण परिस्थितीतून जात असताना, नकारात्मक विचार झटकून टाका असे सांगितल्यामुळे गंभीर स्वरूपाचे संकट निर्माण होऊ शकते.
Acquaintances

जेव्हा तुम्ही म्हणता: “तुला उदासीन होण्याची खरोखर काय आवश्यकता आहे?”

तुमचा मित्र असे ऐकतो: मला प्रामाणिकपणे माहिती नाही. हे मला का व्हावे याची मला कल्पना नाही. आणि तू मला हे विचारल्यामुळे मला असे वाटू लागले आहे की ज्यावेळी खरोखरीच माझ्या स्वत:चा कशावरही ताबा राहिलेला नसताना मी अतिशय गंभीर गुन्हा करतो आहे. तू मला नित्कृष्टतेच्या भावनेत बुडून जाण्यापासून थांबवू शकशील व त्यासाठी मला फक्त इतकेच सांग की हे सर्व ठीक होणार आहे.

तज्ञांचे काय म्हणणे आहे: कोणालाही उदासीन होण्याची ‘इच्छा’ नसते आणि त्याची नक्कीच ‘गरज’ नसते. उदासीनतेसाठी विविध घटक कारणीभूत असू शकतात. तुमच्या मित्राला अशा गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त होण्याचे एकच एक कारण नसते. परंतु तुमच्या अशा मागण्यामुळे त्याला दोषी आणि दु:खी वाटू लागते कारण या बोलण्याने थेट त्याच्यावर दोषारोप केला जातो. आधीच उदासिनातेने ग्रासलेल्या व्यक्तीला त्याबद्दल अन्यायाने जबाबदार धरणे हे नुसते निर्दयी नाही तर अहंकारी आणि त्याज्य कृत्य आहे.

जेव्हा तुम्ही म्हणता: “बाहेर पड, ताजी हवा आत घे आणि शॉपिंगला जा, तू ठीक होशील!”

तुमचा मित्र असे ऐकतो: मी दमून गेलो आहे. मी संपुष्टात येत चाललो आहे. मला चांगला पोशाख करण्यात किंवा शॉपिंगला जाण्यात स्वारस्य वाटेनासे झाले आहे. माझी शेजारच्या रेस्टारंटमधील आवडणारी ‘सुशी’ डिश आता बेचव आणि भूक मंदावणारी वाटू लागली आहे. तू आणि तुझ्या छालानुकीच्या ऐवजी मला फक्त एकांत हवा आहे. कृपया तू मला तो देऊ शकशील का?

तज्ञांचे काय म्हणणे आहे: उदासिनातेसारखा मानसिक आजार ही आरोग्यासाठी गंभीर समस्या असते आणि त्यावर मात करण्यासाठी व्यावसायिक व कुटुंबीयांचा आधार यांची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या मित्राला जेव्हा अंथरून सोडून बाहेरच्या जगात येऊन त्याचे उपक्रम सुरु करण्यास सांगता ते सकारात्मक असते पण उपचारात्मक असेलच असे नाही. अशा मागण्यामुळे त्यांना नेहमी छळण्याची व एकटेपणाची भावना निर्माण करतात.

जेव्हा तुम्ही म्हणता: “आळशी होऊ नकोस आणि औषधांवर अवलंबून राहू नकोस! तू स्वत:च यावर उपचार करू शकशील!

तुमचा मित्र असे ऐकतो: मला वाटणाऱ्या भावनेतून झटकन बाहेर पडण्याचा मी प्रयत्न केला. मी खरेच प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जसे पुढे जावे तसे उदासीनतेने मला अधिकच व्यापून टाकले आणि मी त्याबाबत काहीही करू शकलो नाही. आता मी माझ्या मानसशास्त्रज्ञ (सायकोलकॉजीस्ट) आणि मनोचिकित्सक (सायकीअॅट्रिस्ट) यांच्या मदतीने प्रकाशाचा किरण पाहतो आहे. तुला अशी भीती वाटते का की हे माझे गुप्त व्यसन झाले आहे? कारण मला याची कल्पना नव्हती की एखादी उपचार पध्दती एखाद्या (मानसिक) आजारावर कशी उपयोगी ठरते हे तुला समजू शकणार नाही.

तज्ञांचे काय म्हणणे आहे: मानसिक उदासीनतेच्या आजारातसुध्दा इतर आजाराप्रमाणे उपचाराची योजना, जे डॉक्टर पेशंटवर उपचार करणार असतात त्यानीच ठरवावी. जरी काहीजण औषधोपचाराच्या विरुध्द सल्ला देत असले तरी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की असा निर्णय फक्त डॉक्टरांसाठी त्यांच्या पेशंटच्या गरजेनुसार घेण्यासाठी राखून ठेवावा. ज्याप्रमाणे औषध शारीरिक आजार बरे करतात त्याप्रमाणेच प्रतीरोधके व त्यासारखे इतर प्रकार सुध्दा बरे करण्यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करू शकतात.

संवेदनशील व्हा

मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्यात नसले तरी मानसिक उदासीनता, ताण व चिंता (depression, stress and anxiety) आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेचे ओझे नीट हाताळावे लागते. कधी कधी आपण अजाणतेपणी रुढीप्रिय नकारार्थी गोष्टींचा आधार घेतो आणि त्यामुळे आपल्या मित्रांच्या दुखण्याला इजा पोचवतो. यामुळे त्यांना बहिष्कृत केल्यासारखे वाटते व त्यामुळे त्यांना बरे वाटण्याऐवजी अधिक दुखापत होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यासाठी पुढे येता तेव्हा आपली संवेदनशीलता वाढवणे व आपल्यातील कलंक कमी करणे नेहमीच फायद्याचे असते.
X