Live Love Laugh...
मराठीतील लेख | 01 जून, 2018 रोजी प्रकाशित

पुरुष व मानसिक स्वास्थ्य

Depression in Men

मानसिक आरोग्यातील अस्वस्थता वाढत चालली आहे. भारतातील किमान १३.७% व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मानसिक आजाराने पीडित असतील असा अंदाज आहे. सर्व साधारणपणे स्त्रिया पुरुषांच्या दुप्पट प्रमाणात सामान्य मानसिक आजार (CMD) होण्याची अधिक शक्यता असते. ही तफावत असण्याच्या काही कारणात संप्रेरक (हार्मोन्स) व जीवशास्त्राचा अंतर्भाग असण्याची शक्यता असली तरी त्याच्या इतर कारणांमध्ये आपल्यावर असलेला संस्कृतीचा पगडा याचाही अंतर्भाव आहे. थोडक्यात, पुरुषांचा कल स्वत:चा मानसिक आजार क्षुल्लक समजण्याकडे तसेच अशा आजाराची चिन्हे व लक्षणे याबाबतची अपुरी माहिती देण्याकडे असतो. बहुतेक सर्व समाजघटकांमध्ये पुरुष कणखर व बळकट असावेत अशी अपेक्षा केली जाते व त्यामुळे अनेक वेळा त्यांना मदत मागण्याची गरज नाही असे गृहीत धरले जाते.. पुरुष व स्त्री दोघेही मानसिक आजाराने प्रभावित होऊ शकतात हे ओळखणे महत्वाचे आहे व द्धा त्यांना हवी असलेली मदत घेतील याची आपण खात्री केली पाहिजे.

काही मानसिक आरोग्यातील आजार स्त्रियांना जेवढे प्रभावित करतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पुरुषांना प्रभावित करतात.

 • उदासीनता (डिप्रेशन): जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization), असे सांगते आहे की ४०% भारतीय सौम्य ते भीषण उदासीनता (डिप्रेशन) आजाराने प्रभावित आहेत. पुरुषांमध्ये उदासीनता जरी लक्षणीय प्रमाणात असली तरी हा एक प्रकारचा कमकुवतपणा किंवा नामर्दपणा आहे असे त्याकडे पाहिले जात असल्याने उदासीनता या आजाराकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. याखेरीज उदासीनता पुरुषांमध्ये पाठदुखी किंवा निद्रानाश अशा शारीरिक लक्षणातून दाखविण्याकडे कल असल्यामुळे मूळ उदासीनतेवर उपचार करण्याऐवजी अशा शारीरिक दुखण्यावर आराम पडावा म्हणून उपचार करण्यावर लक्ष केंद्रित होते. पुरुष उदासीनता आजाराची लक्षणे रागाने किंवा चिडचिड करून व्यक्त करतात आणि त्यावर ताबा मिळविण्यासाठी अमली पेय किंवा मादक पदार्थ (ड्रग्ज) यांच्या आहारी जाण्याची अधिक शक्यता असते.
 • इंटरमिटंट एक्सप्लोझिव्ह डिस्ऑर्डर (आयईडी): ही एक वर्तनातील अस्वस्थता असून ती रागाचा अचानक होणारा स्फोट आणि हिंसेतून दर्शविली जाते. जागतिक पातळीवर ७.३% लोकसंख्या, आयईडीमुळे प्रभावित झालेली आहे आणि त्यातही स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. आयईडीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींना उदासीनता व चिंतेसारखे सर्वसाधारण मानसिक आजार जडण्याची चौपट शक्यता असते आणि मादक पदार्थ (ड्रग्ज) सेवन करून त्याचा प्रभाव वाढण्याची तिप्पट शक्यता असते.
 • ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिस्ऑर्डर (ओसीडी): भारताच्या लोकसंख्येपैकी २-३% लोक यामुळे प्रभावित आहेत. ओसीडीचा प्रथम प्रादुर्भाव पुरुषांमध्ये आढळतो. या दुखण्याच्या समवेत पुरुष वारंवार सोशल फोबिआ (Social Phobia) मुळेसुद्धा प्रभावित झाले असल्याचे दिसून येते. ओसीडीच्या बदलत्या अभिव्यक्तीमुळे त्याचे मूल्यमापन करताना आणि त्यावर उपचार करताना लिंग हा मुद्दा विचारात घेणे महत्वाचे आहे असे अभ्यासाने दाखविले आहे.

Narcissist
 • ऑटीझम स्पेक्ट्रम डिस्ऑर्डर (एएसडी): स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या बाबतीत एएसडीचे निदान केले जाण्याची तिप्पट शक्यता असते आणि हे काही प्रमाणात, एएसडीने प्रभावित झालेल्या स्त्री-पुरुषांच्या लक्षणातील विविधतेतून स्पष्ट होते. काही झाले तरी, १% जागतिक लोकसंख्या एएसडीचे निदान केले गेलेली आहे. इतर लोकांशी संपर्क साधण्यामध्ये किंवा परस्पर संवादात अडचण, मर्यादित आवडी, वर्तनातील पुनरावृत्ती व ज्यामुळे व्यक्तीचे दैनंदिन आयुष्य प्रभावित होते अशी लक्षणे दिसणे हे ऑटीझम स्पेक्ट्रम डिस्ऑर्डरचे वैशिष्ठ्य म्हणता येईल.
 • विस्कळीत व्यक्तिमत्व (पर्सनॅलिटी डिस्ऑर्डर): विस्कळीत व्यक्तिमत्त्व हे त्या व्यक्तीच्या संस्कृतीच्या विचार, भावना व वर्तन पद्धतीपेक्षा वेगळे असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात त्रास किंवा दु:ख वाट्याला येते व ते खूप कालावधीपर्यंत टिकून राहते. काही पुरुषांचे विस्कळीत व्यक्तिमत्व स्त्रियांपेक्षा सामान्यपणे अधिक प्रमाणात आढळते ते असे:
  • अनाकलनीय व्यक्तिमत्व (नार्सिसीस्टिक पर्सनॅलिटी (एनपीडी): Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM- V) (डीएसएम – ५) प्रमाणे स्त्रियांपेक्षा पुरुष एनपीडीमुळे अधिक प्रभावित होतात. एनपीडी ही मानसिक स्थिती असणाऱ्या व्यक्तींना स्वत:च्या अहंकाराबाबत अवाजवी जाणीव असते. दुसऱ्यांचे लक्ष आकर्षित करण्याची आवश्यकता आणि त्यांच्याकडून स्तुतीची आत्यंतिक गरज असते. तसेच इतर व्यक्तींबद्दल सहानुभूती नसल्याचे ते उघड करतात.
  • समाजविघातक व्यक्तिमत्त्व - एन्टीसोशल पर्सनेलिटी डिस्ऑर्डर (एएसपीडी): एएसपीडीने प्रभावित होण्याची शक्यता पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तिप्पट प्रमाणात असू शकते. शिवाय पुरुषांमध्ये हिंसक, समाजविघातक वर्तन, आक्रमकता आणि चिडचिड दर्शविण्याची प्रवृत्ती अधिक प्रमाणात असते. नैतिकतेबाबत अनादर, सतत खोटे बोलणे आणि फसविणे, आणि दुसऱ्या व्यक्तीला अनावश्यक मोहिनी टाकून फसविणे अशी एएसपीडीची वैशिष्ठ्ये असुन या आजाराच्या प्रभावाखाली १ ते ४ टक्के लोकासंख्या येते.
  • स्कीसोटायपल पर्सनॅलिटी डिस्ऑर्डर (SPD): एसपीडीने प्रभावित सुमारे ४% लोकसंख्या , असून त्याचा प्रभाव स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळा दिसून येतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की एसपीडीच्या प्रभावाखाली असलेले पुरुष स्त्रियांपेक्षा वेगळी लक्षणे म्हणजे अधिक दबावाखाली असणे, विचित्र वर्तन करणे वेगळ्या प्रकारे बोलणे दाखविण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये दिसून येणारी लक्षणे म्हणजे समाजाची भीती व विचित्र गोष्टींवरील विश्वास असण्याची शक्यता असते.

अशा प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या अस्वास्थ्याने पीडित असलेला लोकसंख्येचा लक्षणीय भाग आहे व अशा प्रभावित व्यक्तींना आवश्यक असणारे उपचार खात्रीने पुरविणे महत्वाचे आहे. वर उल्लेख केलेले बहुतांश आजार औषध व उपचार दोन्हीचा वापर करून परिणामकाररित्या बरे केले जाऊ शकतात.


भारतात अगोदरच मानसिक आजारासाठी मदत घेणे हे अत्यंत लांछानास्पद समजले जाते. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनी निरोगी लोक दुषित न होण्यासाठी. त्यांच्यापुरता एक वेगळा गट करावा असे 60% व्यक्तींना वाटते. आमच्या देशातील पुरुष या समस्येमुळे प्रत्यक्ष प्रभावित होत आहेत कारण त्यांनी काही विशिष्ट प्रकारे कृती करण्याची अपेक्षा केली जाते. पुरुष दणकट असले पाहिजेत आणि त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू नयेत अशी अपेक्षा असल्यामुळे त्यांना हवा असलेला आधार ते मिळवू शकत नाहीत. जे मानसिक आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रचलित असतात असे आजार पुरुषांना असले तर त्याची तुटपुंजी माहिती देण्याची अधिक शक्यता असते. याशिवाय, वर उल्लेख केलेल्या मानसिक आजारांसारखे काही आजार हे स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक प्रमाणात प्रभावित करणारे असतात. आपण जर मानसिक आजार स्वीकारणे व व्यक्त करणे अशी आपली संस्कृती तयार केली नाही तर या विकारांवर ताबा ठेवता येणार नाही. भारतातील मानसिक स्वास्थ्याच्या ओझ्याबद्दल आपणास संबोधण्यास सांगितले तर आपल्याला पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्यापासून सुरुवात करणे आवश्यक आहे.


जर आपण किंवा आपल्या माहितीतील कोणी व्यक्ति वर उल्लेख केलेल्या मानसिक आजाराने प्रभावित झाली असल्याची लक्षणे आढळलयास कृपया मानसिक आरोग्य व्यावसायिकाशी संपर्क साधावा. आपल्या भागातील मानसिक आरोग्य व्यावसायिक शोधण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

X