लिव लव लाफ...
लेख. 30 जुलाई, 2019 को प्रकाशित

आपणास उदासीनतेने ग्रासलेले असताना उत्पादनक्षम कसे राहावे?

उदासीनता हे मनाचा कल बिघडल्याने निर्माण होणारे दुखणे आहे. सततची खिन्न मन:स्थिती, दु:खी भावना व आवडी कमी होणे ही त्याची लक्षणे आहेत. उदासीनता ही दैनंदिन जीवनात आणि दररोजच्या कामात हस्तक्षेप करू शकते. जागतिक आरोग्य संघटना, असे सांगते की, भारतातील ३६.९% प्रौढांनी त्यांच्या आयुष्यात उदासीनतेचे सौम्य ते थोडे तीव्र स्वरूपाचे आणि इतर १.८% प्रौढांनी त्याचे तीव्र आजार अनुभवलेले आहेत असे दिसून आले आहे. प्रौढ, विशेषत: कामधंदा करीत असलेल्या व्यक्तींमध्ये तीव्र उदासीनतेचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे. उच्च पातळीचा कामाचा ताण असणारे व उदासीनता यांचा जवळचा संबंध असल्याचे अनेक परीक्षणात दिसून आलेले आहे.

उदासीनतेच्या आजारामुळे तुमच्या कामातील कौशल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही उदासीनतेने ग्रासलेले असताना अगदी छोट्यातील छोटे काम म्हणजे सुध्दा तुम्हाला तुमच्या खांद्यावर सर्व जगाचे ओझे आल्यासारखे वाटते. तथापि, उदासिनातेशी मुकाबला करीत असताना सुध्दा तुम्ही काही छोट्या गोष्टी करून तुमचे काम थोडे अधिक चांगले करू शकता आणि अशा गोष्टी तुमच्या कामातील उत्पादकता वाढवू शकता.
Generalized Anxiety Disorder (GAD)

दिनक्रम आखणे

दैनंदिन कामे आखून घेतली की तुम्हाला आता काय करायचे, हा प्रश्न मनातून काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला एक आखीव-रेखीव दिवस मिळतो आणि तुम्ही उदासीन असताना अवघड वाटते ती निवड करण्याची सक्ती टाळण्यास मदत होते.
Panic Disorder

कामाचे वेळापत्रक करणे

तुमच्या कामांचे वेळापत्रक तयार करा आणि ती संपविण्यासाठी सहज-साध्य तारखा ठरवा. वेळापत्रक लवचिक ठेवून काम केल्याने स्वत:ला योग्य मार्गावर ठेवण्यास मदत होते. नंतर, जेव्हा तुमची मन:स्थिती उंचावलेली असेल तेव्हा तुम्ही अधिक काम करून आधीच्या काम करू नये असे वाटत असलेल्या दिवसांची भरपाई करू शकता.
Social Phobia

नेमून दिलेल्या कामांचे विभाजन करणे

तुमच्या कामांची/ कामांच्या जबाबदारींची लहान-लहान भागात विभागणी करण्यासाठी थोडे प्रयत्न पुरेसे असतात. ही लहान-लहान कामे करणे तुम्हाला सोपे जाईल. याशिवाय, ज्यावेळी तुम्ही एकेक काम संपवून आगेकूच करता तेव्हा काम संपविल्याची जाणीव तुम्हाला अधिक प्रेरणादायी ठरते.
Post Traumatic Stress Disorder (PTSD)

तुमच्या प्रगतीसाठी अपेक्षांमध्ये बदल करणे

तुम्ही आत्मविश्वासपूर्वक गाठू शकता अशी उद्दिष्टे तुमच्यासाठी ठरविणे महत्त्वाचे असते. तुमची बदलती मन:स्थिती लक्षात घेऊन ही उद्दिष्टे ठरविण्याचा प्रयत्न करा. विशेषत: तुम्ही निराश मन:स्थितीतून जात असताना अगदी छोट्यातले छोटे कामसुध्दा तुमच्या उत्पादकतेमध्ये वाढ करते हे लक्षात घ्या.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

मजबुती आणणे

ज्या दिवसांमध्ये तुम्ही उदासीनतेच्या अवस्थेतून जात असाल अशा वेळी तुम्ही पूर्ण केलेले प्रत्येक काम तुम्ही स्वत:ला बक्षीस देऊन साजरे करा. ह्या बक्षिसाच्या गोष्टी चॉकलेट खाणे किंवा यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहणे अशा प्रकारच्या असल्या तरी ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल अशा असाव्यात. या बक्षिसांची तुम्हाला पुढील कामे पूर्ण करण्यासाठी उत्तेजन मिळण्यास मदत होईल
Obsessive Compulsive Disorder (OCD)

छोटी सुट्टी (ब्रेक्स) घेणे

कामे करताना थोडा ब्रेक घेणे किंवा छोटी सुट्टी घेणे नेहमीच फायदेशीर असते. थोड्या-धोड्या वेळाने छोटी सुट्टी घेतल्याने ताणामुळे शरीरग्रंथित स्रवणाऱ्या ‘कॉर्टीसोल’ (Cortisol) या संप्रेरकाची (हार्मोन) पटली कमी होणे व ‘डोपमाईन’ (Dopamine) सारख्या इतर रसायनांची पातळी वाढते ज्यामुळे आपणास चांगले वाटण्यास मदत होते. छोट्या सुट्ट्या आपल्याला अधिक उत्पादनक्षम बनविण्यास मदत करतात. थोडा वेळ स्वत:ला बौद्धिकदृष्टीने कामासंबंधीच्या विचारापासून वेगळे केल्याने पुन्हा जेव्हा तुम्ही हाती घेतलेल्या कामात लक्ष घालता तेव्हा त्या कामाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, अशा सुट्टीमध्ये आपल्या हात-पायांना लांब करणे आणि आसपास थोडे चालणे उपयोगी ठरते. सभोवतालचे बदल तुम्हाला उत्पादकता कमी असण्याच्या सततच्या चिंतेपासून दूर नेतात आणि खरे म्हणजे तुम्हाला आधी नसलेली स्फूर्ती देऊ शकतात.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

सभोवताली अदलाबदल करणे

कामाच्या जागेवरील टेबल-खुर्च्या, लेखन-साहित्य यांच्या जागेत अदलाबदल केल्यास तुम्हाला तीच जागा नवी आणि मनोरंजक दिसू लागते. त्यामुळे तुमची मन:स्थिती परत टवटवीत होऊ शकते. बाकी काही जरी झाले नाही तरी ही अदलाबदल तुम्हाला काहीतरी काम देते आणि त्याचा परिणाम तुम्हाला उत्पादकता वाढविण्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा देण्यात होऊ शकतो.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

स्वत:ची काळजी घेणे

प्रथम तुम्ही स्वत:ला ज्या गोष्टी आनंद देतात किंवा ज्या वस्तू आवडतात त्यांची यादी तयार करा. त्यानंतर, त्यातील काही गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनात येतील असे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निराश मनोवृत्तीत असाल तेव्हा स्वत:ला चांगले वागवा उदा; तुम्हाला आवडणारी खाद्य-पेये खाणे किंवा आवडता सिनेमा पाहणे. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटू लागेल.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

आधार यंत्रणा

तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना तुमच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारीबाबत माहिती द्या आणि तुमच्या सध्याच्या कठीण प्रसंगी त्यांना तुमहाला सहाय्य करू द्या. एखाद्या दुसऱ्या विश्वासू व्यक्तीबरोबर तुमचे मन मोकळे केल्याने तुम्हाला तुमचा एकटेपणा कमी जाणवेल. तुमच्यासाठी एक आधार गट तयार करण्याचा प्रत्यत्न करा ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या मनाची उद्विग्न अवस्था उघड करू शकता. या लोकांना तुम्ही मागितलेल्या आधारासाठी तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तींची आधीच माहिती असल्याने ते तुम्हाला त्याबाबत माहिती सांगू शकतात.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

व्यायाम

तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात किमान ३० मिनिटे व्यायामासाठी आखून घ्या. तुम्ही व्यायाम करत असताना तुमचे शरीर इंडोर्फिन्स (Endorphins) म्हणजेच तुमच्या मेंदूच्या संपर्कात येणारी संप्रेरके किंवा रसायने स्रवते, ज्यामुळे तुम्हाला आनंदी किंवा सुखी वाटते. नियमित व्यायामामुळे मानसिक ताण कमी झाल्याचे तसेच चिंता आणि उदासीनतेवर ताबा मिळत असल्याचे दिसून आले आहे.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

श्वसनाचे/मन:स्वास्थ्याचे तंत्र

विशेषत: ज्यावेळी तुम्ही खूप उदासीन किंवा ताण-तणावाच्या अवस्थेत असता त्यावेळी जॅकोबसेन यांचे स्नायू-स्वास्थ्याचे प्रगतीशील तंत्र अथवा त्यासारखे श्वसनाचे व्यायाम किंवा मन:स्वास्थ्याचे तंत्र वापरण्याने तुम्हाला उपयोग होऊ शकतो. या दोन्ही प्रकारांनी उदासीनता कमी होण्यास मदत होते. या गोष्टी तुमच्या दैनंदिन कामाचा एक भाग बनविल्यास त्याचा निश्चित फायदा होताना दिसतो.
Obsessive Compulsive Disorder (OCD)

एक-एक पावलाने प्रत्येक गोष्टीत प्रगती करा.

सरते शेवटी, अत्यंत महत्त्वाची सूचना अशी द्यायची आहे की प्रत्येक वेळी एकच गोष्ट करा. प्रथम आज हाती घेतलेल्या त्वरित व महत्तवाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. एकदा ते संपले की इतर थोडी सावकाश करण्यासारखी कामे हाती घ्या. आजच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या कामात तत्परता दाखविता येईल आणि ते तुम्हाला बाहेरून प्रेरणा देण्याचे काम करते, ज्यामुळे तुम्हाला अधिक उत्पादनक्षम होण्यास मदत होईल.
(डिसक्लेमर) आमचा काही संबंध नसल्याचे विधान: कृपया हे लक्षात ठेवा की या ठिकाणी फक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सर्वांसाठी उपयोगी ठरतीलच असे नाही. यातील काही सूचना अशा व्यक्तींसाठी आहेत ज्यांना उदासीनतेने ग्रासले असले तरी त्या महत्त्वाच्या उच्च पदावर आपापल्या संस्थेत कार्यरत आहेत. यातील कोणतीही सूचना तुम्हाला उपयुक्त ठरली नसेल तर तुम्ही सदैव तुमच्या उपचार करणाऱ्या व्यक्तीशी या विषयी चर्चा करू शकता. ते तुम्हाला श्रेयस्कर सूचना देण्याची शक्यता अधिक आहे.
X