Live Love Laugh...
Article. Published on Sept 30, 2019.

मानसिक आजाराबाबत काळजी असलेल्यांशी संवाद

मानसिक आजाराची चिंता असणाऱ्या आणि आपल्या जीवलग व्यक्तींशी त्याबाबत बोलणे नेहमीच अवघड असते. त्यांच्या आधार व्यवस्थेचा एक भाग होऊन राहण्यासाठी त्या जीव्लागास मानाने व संवेदनशील (Empathy) मनाने वागविणे अतिशय महत्त्वाचे असते. मानसिक उदासीनता, चिंता किंवा इतर मानसिक आजाराबाबत काळजी वाटणाऱ्या बहुतांश व्यक्तींना एकाकी किंवा इतरांपासून वेगळे झाल्यासारखे वाटते असे सांगतात. म्हणून तुमच्या संवेदनशील आणि सुज्ञपणाच्या क्षमतेसह तुमची उपस्थिती त्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे आजाराचा मुकाबला करण्यास व त्यातून बरे होऊन लवकर बाहेर पाडण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

दाटून आलेले अश्रू आणि अनावर झालेल्या भावनांना सामोरे जाण्याची तयारी करा.

मानसिक आजाराची चिंता असलेल्या व्यक्तींशी बोलण्यापूर्वी त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याचा तर्क केल्याने तुम्हाला तेथे शांत आणि एकसंध राहण्यास मदत होईल. नेहमी हे लक्षात ठेवा की ते अत्यंतिक दु:ख व रागाशी मुकाबला करीत आहेत आणि भावनिक असुरक्षिततेमुळे त्यांना कधीही रडू कोसळेल. उलटपक्षी ते त्रयस्थ आणि भावनाशून्य सुध्दा वाटू शकतील. या दोन्ही प्रतिक्रिया सामान्य असल्याने दोन्ही प्रसंगांची आधीच पूर्वकल्पना केल्यास तुम्हाला तेथे सहजपणे वावरण्यास मदत होईल.

त्यांनी स्वत:भोवती घातलेल्या मर्यादांचा मान राखा.

प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक गरजा वेगळ्या असतात याची नोंद घ्या. काही लोकांना जवळ घेणे आणि दिलासा देणे आवडू शकेल तर इतरांना तुम्हाला थोडे लांब ठेवणे अधिक पसंत असेल. जर त्यांची खातरजमा कशी करावी हे तुम्हाला समजत नसेल तर त्यांना त्यांची पसंती विचारावी. अगदी सहजपणे, “तुमचा हात मी हातात घेतला तर चालेल ना?” असे विचारले तरी त्यांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते तुमच्या ध्यानात येईल. तुम्ही त्यांच्यासाठी तेथे आलेले आहात आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात ही कल्पना त्यांच्या मनात दृढ करायची आहे हे तुम्ही लक्षा ठेवा.

तुम्ही टीकाकार किंवा स्वत:चा बडेजाव दाखविणारे अशी प्रतिमा त्यांच्या मनात उमटणार नाही याची खबरदारी घ्या.

जेव्हा तुमच्या जीवलग व्यक्तीबरोबर सुरु असलेल्या संभाषणाला झगड्याचे स्वरूप येईल तेव्हा ती व्यक्ती बचावात्मक पवित्रा घेईल. “फारच छान” किंवा “इतर बहुतेक सर्व लोकांपेक्षा तुम्ही चांगल्या स्थितीत आहात. त्याबद्दल कृतज्ञ रहा” अशी वाक्ये सुध्दा अशा ठिकाणी आधार देत नाहीत. म्हणून संवादाची सुरुवात तुमचा कळवळा आणि कुतूहल दर्शवून करा. त्यांना जितके बोलायचे आहे ते बोलू द्या आणि त्यात व्यत्यय आणू नका. कधी कधी अतिशय लक्षणीय मदत तुम्ही लक्षपूर्वक आणि संवेदानशीलतेने ऐकण्यातून निर्माण होते.

संवेदाशीलता आणि सहानुभूती

“दुसऱ्या व्यक्तीच्या, जिवमात्राच्या किंवा काल्पनिक भूमिकेच्या भावना ओळखण्याची व त्यात सहभागी होण्याची व्यक्तीची क्षमता, अशी संवेदनशीलता (एम्पथी) या शब्दाची व्याख्या होऊ शकेल.” (कार्ल रॉजर्स, ब्रेन ब्राऊन). जरी संवेदनशीलतेला सहानुभूती (दुसऱ्या व्यक्तीला वाईट परिस्थितीशी झगडताना पाहून आपल्याला वाटणारी दया, दु:ख किंवा कणव) समजण्याचा मोह होत असला तरी दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. संवेदनशीलता तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वत:ला कल्पिते. तुमची प्रिय व्यक्ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जाते आहे हे समजण्यासाठी या महत्त्वाच्या प्रावीण्याची आवश्यकता असते.

प्रतिक्रियात्मक नव्हे तर प्रतिबिंबात्मक श्रवण

मानसिक आजारात असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तींना सल्ला देण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा किंवा ते बोलतील त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिबिंबात्मक श्रवण करून तुम्हाला त्याच्या बोलण्याचे मर्म समजू शकेल. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे काय चुकले ते सांगण्याचा मोह झाला तरी तो टाळा कारण तुमची प्रिय व्यक्ती ते ऐकून घेण्याच्या मन:शितीत तेव्हा नसते.

त्यांच्या समस्यांची तुमच्या स्वत:च्या अनुभवांशी तुलना करून ते कमी लेखू नका.

जेव्हा आपल्याला असे वाटू लागते की आपण यासारख्या परिस्थितीतून गेलो आहोत तेव्हा आपाल्या त्या कथांना अधिक महत्त्व देण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे अनाहूतपणे तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही त्याच्या प्रश्नांचे महत्त्व कमी लेखत आहात असे वाटू लागते.

त्यांना सहाय्य मिळणार असल्याची खात्री वाटू दे.

त्याना पुन:पुन: सांगत रहा की सध्या जरी गोष्टी गुंतागुंतीच्या दिसत असल्या तरी त्या सुधारू शकतात, सुधारत राहतील. त्यांना कळू द्या की सुधारण्यासाठी सहाय्य घेणे ही लक्षणीय गोष्ट आहे. त्यांना सांगा की मानसिक आरोग्य व्यावसायिकाशी बोलणे ही चांगली कल्पना आहे. त्यामुळे उपचार करणारे, सल्लागार किंवा मानसिक आरोग्य तज्ञांना परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे शक्य होईल. तुम्ही नेहमीच ऑनलाईन जाऊन पटकन तुमच्या मित्राच्या जवळ उपलब्ध असलेल्या स्रोतांची माहिती पाहून ठेवू शकता. याशिवाय ते मानसिक आरोग्य व्यावसायिकाकडे जाताना त्याच्या बरोबर जाण्याची तयारी असल्याचे तुम्ही त्त्यांना सांगू शकता. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यास व तुमच्याबद्दल विश्वास वाटण्यास मदत होऊ शकते.

संयम बाळगा

या परिस्थितीत असे सुध्दा शक्य आहे की तुमची प्रिय व्यक्ती बतावणी किंवा नाटक करीत असेल. मानसिक आजाराबरोबर लहारीमध्ये किंवा मूडमध्ये बदल होत राहणे नेहमीच निगडीत असते. त्यामुळे एखाद्या दिवशी तुमचा मित्र खवळलेला दिसला तरी त्याला तुम्ही काहीतरी केल्यामुळेच तसे झाले असेल असे समजू नये. याचे कारण त्यांना काय वाटत राहते त्यावर ताबा ठेवणे कठीण असल्यामुळे सुध्दा असे होईल. तेव्हा तुम्ही ते तुमच्या मनावर घेऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीची वागणूक व संवाद-कौशल्य त्यांच्या आजारामुळे बिघडू शकते हे लक्षात घ्या. त्याच वेळी तुमच्यासाठी तुम्हीच मर्यादा निश्चित करा. कारण तुमचे मानसिक स्वास्थ्य हे सुध्दा त्यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे.

त्यांच्याबरोबर नंतरसुध्दा संपर्क ठेवा

हे संभाषण जरी तुमच्यासाठी एक महत्त्वाचे संशोधन असले तरी त्यांची अधून-मधून भेट घेत राहणे हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे असते. तुमच्या नित्य कामामुळे आणि व्यावहारिक जबाबदाऱ्या असल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी दररोज भावनिक संभाषण साधणे अतिशय आव्हानात्मक असेल. परंतु दिवसातून एक ‘तुम्ही कसे आहात?” अशी साधी चिठ्ठीसुध्दा त्यांना काळजी घेत असल्याचे दाखविण्याची मदत करेल, आधार देईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजी त्यांना एकटेपणा जाणवणार नाही.

X